बहादूरगड किल्ल्यात बारव स्वच्छता मोहिम

कोळगाव – श्रीगोंदे तालुक्‍यातील पेडगाव येथील दुर्लक्षित राहिलेला बहादूरगड या भुईकोट किल्ल्‌यातील प्राचीन हत्ती मोट बारवेला पुनर्जीवित करण्याच्या कामाला सुरुवात शिवदुर्ग संवर्धन समितीने पुणे यांनी बारवेच्या जिर्णोद्धाराचे मंजुरीचे पत्र पुरातत्व खात्याकडून मिळवून सुरू केले. समितीचे अध्यक्ष पंडित अतिवाडकर यांनी सपत्नीक शास्त्रोक्त पद्धतीने महापूजा करून बारवेच्या स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली.

हे कार्य लोकसहभागातून केले जाणार आहे. या भव्य बारवेवरती दोन हत्ती मोट चालवून पूर्ण पेडगाव नगरीला जमिनीतून खापरी पाईपलाईनने पाणी पुरवठा तसेच गडावरील कारंजे, स्नानगृह, दरबार, हमामखाना, सैन्य स्थळ व मंदिरे येथे या पाण्याचा वापर केला जात होता. या बारवेलगत यादवकालीन सालंकृत अलंकृत लक्ष्मी-नारायण मंदिर व बालेश्वर मंदिर तसेच भव्य असा राजवाडा आहे. येथील पाण्याचा मुख्यत्वे उपयोग किल्ल्यातील संवर्धन कार्यासाठी होणार आहे.

-Ads-

या कार्यक्रमासाठी समितीचे उपाध्यक्ष राजेश नेलगे, समिती सदस्य डॉ. निलेश खेडकर, देवेंद्र आवचर, प्रा. राजेश बाराते, प्रल्हाद जाधव व गडपाल भाऊ घोडके, नंदकिशोर क्षीरसागर, मच्छिंद्र पंडित यांनी महत्वाचे योगदान दिले. या संवर्धनासाठी विशेषकरून इंग्लंड, ऑस्ट्रेलियन इतिहास अभ्यासक उपस्थित होते.

यावेळी पेडगावचे सरपंच भगवान कणसे, उपसरपंच देविदास शिर्के, नारायण खेडकर, नानासाहेब झिटे, बाळासो नवले, प्रा. शिवाजी नेटके, श्रीगोंदे तालुक्‍यातील शिवदुर्ग ट्रेकर्स ग्रुपचे अध्यक्ष राजेश इंगळे, योगेश चंदन, दीपक गुंड, शिवाजी वागस्कर व मोठ्या संख्येने शंभुभक्त, गडप्रेमी व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. तरी या संवर्धन कार्यासाठी गडप्रेमींनी सहभाग नोंदवावा, तसेच श्रमदानाला येणाऱ्या गडप्रेमींची निवास व भोजनाची व्यवस्था समितीमार्फत केली जाईल, असे आवाहन करण्यात आले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)