वसंतराव नाईक महामंडळाला निधी द्यावा : मोहन शेगर 

सोनई – वसंतराव नाईक भटक्‍या विमुक्त महामंडळाला निधी देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मोहन शेगर यांनी पालकमंत्री राम शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत सविस्तर असे की, वसंतराव नाईक महामंडळाला 2016 पासून कोणत्याही प्रकारचा निधी दिलेला नाही, त्यामुळे या महामंडळाद्वारे मिळणाऱ्या लाभापासून गरीब भटके विमुक्त वंचीत आहेत. सध्या हे खाते पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे असून, समाजाचे नेते आहेत तरीसुद्धा पालकमंत्री यांना या महामंडळाचा विसर पडलेला दिसतोय, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत. तरी वसंतराव नाईक महमंडळाला त्वरीत निधी मिळवून महामंडळाला सबसिडी लागू करण्यात यावी, शासनाने आता भटक्‍या विमुक्त समाजाचा अंत पाहू नये, असे मोहन शेगर यांनी निवेदनात म्हटले आहे.

-Ads-

शासनाने त्वरीत या महामंडळाबाबद निर्णय न घेतल्यास बहुजन समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते शेगर यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)