टाकळीभानच्या ग्रामसभेत अभूतपूर्व गोंधळ

टाकळीभान – टाकळीभान येथे सन 2019-20 चा विकास आराखडा तयार करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली होती. मात्र, ग्रामसभेत 2017 -18 च्या अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित राहीलेल्या शेतकऱ्यांनी लाभाच्या यादीत नाव सामाविष्ट न झाल्याने कामगार तलाठी यांनी दुजाभाव करीत केवळ धनदांडग्या शेतकऱ्यांचाच सामावेश करुन सर्वसामान्यांना वंचित ठेवल्याचा आरोप करीत गदारोळ केला.

वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येणाऱ्या निधीच्या नियोजनासाठी विकास आराखडा तयार करण्यासाठी आज ग्रामसचिवालयाच्या सभागृहात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच रुपाली धुमाळ या सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. वित्तआयोगाचा 100 टक्‍के निधी ग्रामविकासासाठी खर्च करण्यात येणार आहे. आरोग्य, शिक्षण, अंगणवाडी, पाणीपुरवठा, स्वच्छता या कामांचा विकास आराखड्यात समावेश करावयाचा आहे. मात्र या मूळ विषयाला बगल देत ग्रामसभा 2017/18 च्या अतिवृष्टीच्या अनुदानाच्या मुद्यावरच गाजली.

2017/18 अतिवृष्टी सर्वत्र झाल्याने व या नुकसानीचे सर्व शेतकऱ्यांचे पंचनामेही झाले, मात्र, अनुदानाच्या पात्र यादीत ठराविक धनदांडग्या शेतकऱ्यांचाच समावेश झाल्याने गेल्या दोन महिण्यांपासुन तिव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. त्याचे पडसाद ग्रामसभेत चांगलेच उमटले. कामगार तलाठी यांनी पंचनामे करण्यात दुजाभाव केल्याचा आरोप अनेकांनी केला. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी अनुदानापासुन वंचित राहिल्याचाही आरोप अनेकांनी केला.

यावेळी पंचनामे केलेल्या शेतकऱ्यांची यादी ग्रामसभेत वाचन करावी अशी मागणी माजी सरपंच भाऊसाहेब मगर व इतरांनी केली. मात्र कामगार तलाठी आकांक्षा ढोके यांनी यादी वाचनास असमर्थता दाखवत ज्याला यादी पहायची असेल त्यांनी कार्यालयात येऊन पहावी, असे उत्तर दिल्याने कामगार तलाठी यांनी ग्रामसभेचा अवमान केल्याचाही आरोप काही ग्रामस्थांनी केला.

यावेळी ज्ञानदेव साळुंके, दतात्रय नाईक, रमेश धुमाळ, कार्लस साठे, एकनाथ लोखंडे, विलास दाभाडे, पोपट जाधव, भारत भवार, पाराजी पटारे, अविनाश लोखंडे, भाऊसाहेब मगर, प्रकाश धुमाळ, राजेंद्र कोकणे, रावसाहेब मगर, प्रकाश दाभाडे, आप्पासाहेब रणनवरे, प्रताप मगर, नारायण काळे, बाबासाहेब बनकर, नाना रणनवरे, अनिल बोडखे, चित्रसेन रणनवरे, कान्हा खंडागळे, आकांक्षा डोखे, गणेश गायकवाड, बडू हापसे, राजाराम फुलवर, केरुबापू मगर, बापू शिंदे आदी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)