शहरातील चितळे रोडवरील जुगार अड्ड्यावर छापा

नगर – शहरातील चितळे रोडवरील चित्रा टॉकीजच्या मागे असलेल्या जुगार क्‍लबवर शहर उपविभागीय पोलिस पथकांने काल सायंकाळी सव्वासहा वाजता छापा टाकून 8 जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या छाप्यात रोख रकमेसह 1 लाख 2 हजार 330 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बबन बाबुराव कोकणे (वय 54,रा.बालिकाश्रम रोड,जाधवमळा), सुरेश खंडु बडेकर (वय 45,रा.दरेवाडी सोलापूर रोड), विठ्ठल विमल अंधारे (वय 54,रा.ताराबाग,नगरपुणे रोड), सुनिल रमेश गोरे (वय 55,रा. धोंडेमळा,केडगाव), मच्छिंद्र आसाराम दळवी (वय 42,रा.सबजेलचौक), आदम शेख अहमद (वय 45,रा.बुरूडगाव), गणेश नंदू वडे (वय 27,रा.पारगल्ली,माळीवाडा), रमेश गुलाबराव धेंड (रा.चित्रा टॉकीजचे मागे,आनंदीबाजार) यांच्याविरूध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शहर पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक कल्पना शिरदावडे, सुयोग सुपेकर, पोलिस नाईक महेश मगर, पोलिस कॉन्स्टेबल सागर द्वारके यांनी ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)