पेन्शन मिळवून देण्यासाठी शिक्षक समिती कटिबध्द – औटी

नगर : प्राथमिक शिक्षक समिती नगर शाखेच्यावतीने शिक्षकांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

प्राथमिक शिक्षकांचे कचेरीसमोर धरणे आंदोलन

नगर – नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी शिक्षक समिती कटीबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष रा. या. औटी यांनी केले. प्राथमिक शिक्षक समिती नगर शाखेच्यावतीने शिक्षकांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या धरणे आंदोलनाप्रसंगी औटी बोलत होते.

पुढे ते म्हणाले, पेन्शन मिळणे हा शिक्षकांचा हक्क आहे. सेवानिवृत्तीनंतर पेन्शनने जगण्याचा मोठा आधार मिळतो. परंतु या शिक्षकांना पेन्शनच मिळाली नाही तर, त्यांचे कुटुंब सन्मानाने जगू शकणार नाही. पेन्शन नसल्याने आत्तापासूनच शिक्षकांना असुरक्षितता वाटू लागली आहे. त्यांना हक्क मिळवून देण्यास आम्ही बांधील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाध्यक्ष संजय धामणे यांनी शिक्षकांच्या बाबतीत दुर्देवी घटना घडल्यास त्यांचे कुटुंब उघड्यावर येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पेन्शनबरोबरच वरिष्ठ वेतनश्रेणीचा नव्याने काढलेला जाचक शासन निर्णय रद्द करावा, घोषणा केल्याप्रमाणे सातवा वेतन आयोग एक जानेवारीपासून अमलात आणावा, एमएससीआयटी मुदतवाढीच्या आदेशाची अंमलबजावणी करावी अशा अनेक मागण्या शिक्षक समितीचेवतीने करण्यात आल्या आहेत.

धरणे आंदोलनात शिक्षकनेते संजय कळमकर, सीताराम सावंत, विजय काकडे, नितीन काकडे, सुदर्शन शिंदे, भास्कर नरसाळे, मच्छिंद्र दळवी, विजय महामुनी, कल्याण राऊत, किरण दहातोंडे, राजेंद्र ठोकळ, बाळासाहेब खेडकर, सचिन नाबगे, राजेंद्र ठाणगे, शरद कोतकर, जयप्रकाश साठे, नाना गाढवे, संभाजी औटी, संजय रेपाळे, बाळासाहेब गोल्हार, संतोष डमाळे, प्रताप पवार, युवराज हिलाळ, बी.के. बनकर, साहेबराव उबाळे, सलीम शेख आदिंसह शिक्षक सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)