आढळातून अखेर पाणी सोडण्यास झाला प्रारंभ

संग्रहित छायाचित्र.....

अकोले : अकोले तालुक्‍यातील देवठाण येथील आढळा धरणाच्या लाभक्षेत्रात रब्बी हंगामातील पाण्याचे पहिले व अखेरचे आवर्तन आज गुरुवारी (दि. 29) सकाळी नऊ वाजता जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोडले. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर धरणाच्या दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. प्रारंभी उजव्या कालव्यात 30 क्‍युसेक व डाव्या कालव्यात 20 क्‍युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान, गरजेनुसार पाण्याच्या प्रवाहात वाढ करण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी आर. डी. आरोटे यांनी सांगितले.

अकोले, संगमनेर व सिन्नर (नाशिक) तालुक्‍यांतील या धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी एक हजार 300 हेक्‍टर सिंचनक्षेत्रासाठी अधिकृतपणे पाण्याची मागणी केली आहे. यंदा पावसाळ्यात धरण भरलेच नाही. धरणात आज सकाळी 527 दलघफू पाणी साठा आहे. त्यापैकी 276 दलघफू पाणी सिंचनासाठी वापरले जाणार आहे. तर उर्वरित साठा आरक्षित ठेवला गेला आहे.

धरणात क्षमतेच्या सुमारे निम्मेच पाणी असल्याने लाभक्षेत्रात शेतीसाठी तीव्र पाणी टंचाईची चिन्हे दिसत आहेत. अशा परिस्थितीत काटकसरीने यंदाच्या एकमेव आवर्तनात पाण्याची गळती रोखण्याचे मोठे आव्हान सिंचन यंत्रणेपुढे आहे. ही बाब ध्यानी घेऊन एकरी 3 तास व जास्तीत जास्त 3 एकरला पाणी देण्यात येणार आहे. पाणी चोरी करू नये. पाट अथवा चारी फोडू नये. असे आढळून आले, तर पोलिसी कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)