नगर : नगर-मनमाड रोडवरील विळद घाट (ता. नगर) परिसरात टेम्पोतून गोवंश जनावरांची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या टेम्पोला एमआयडीसी पोलिसांनी पकडले आहे. पोलिसांनी या टेम्पोतून सुमारे 20 जनावरांची सुटका केली आहे. वाहतूक करणारा पाच लाख रुपये किंमतीचा टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे. प्राणी संरक्षण अधिनियमातील तरतुदींनुसार पोलिसांनी मोहसीन मुश्ताक कुरेशी (वय 35, रा. झेंडीगेट) याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सहायक फौजदार रफिक उस्मान शेख यांनी फिर्याद दिली आहे. नगर-मनमाड रोडने चाललेल्या टेम्पोंतून गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या टेम्पो पकडला. ही जनावरे टेम्पोंत क्रूरपणे कोंबली होती.
एक गाय, 13 कालवडी, सहा गोऱ्हे अशी एकूण 20 गोवंश जनावरे या टेम्पोंतून बाहेर काढली. छोट्या टेम्पोंत ही जनावरे क्रूरपणे कोंबली होती. त्यांना चारा आणि पाण्याची देखील सोय केली नव्हती. या जनावरांची विनापरवना व बेकायदेशीरपणे वाहतूक करण्यात येत होती, असेही पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा