शेतकऱ्यांना पाणी मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

आशुतोष काळे : पाटबंधारे खात्याच्या राहाता उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या

कोपरगाव – अनेक शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे क्रमांक सातचे अर्ज भरून दिले आहेत. परंतु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी अडीच किलोमीटर पर्यंतच्या शेतीला पाणी देण्यात येणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र या प्रश्‍नावर कुठलाच निर्णय घेण्यात न आल्याने युवा नेते आशुतोष काळे यांनी राहाता उपविभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. तसेच जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे काळे यांनी सांगितले.

“पाटबंधारे विभागाने घेतलेला निर्णय लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. सरसकट सर्वच शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली होती. परंतु शेतकऱ्यांच्या दु:खाची जाणीव नसणाऱ्या लोकप्रतिनिधींना तालुक्‍यात काय चालू आहे याची पुसटशी कल्पना नसते. त्यांनी माझ्या मागणीला टीका टिप्पणी समजून माझ्या वक्तव्याची खिल्ली उडविली, हे दुर्दैव आहे.
– आशुतोष काळे

काळे यांनी सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळावे, या मागणीचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र कुठलाही निर्णय न झाल्याने काळे यांच्या आवाहनाला पाठिंबा देत रामपूरवाडीच्या शेतकऱ्यांनी दोन दिवसांपासून पाटबंधारे कार्यालयात उपोषण सुरु केले आहे. काळे यांनी आंदोलन करण्यासाठी आंदोलन स्थळी पोहोचण्यापूर्वीच उपविभागीय अभियंता कासम गोटमवार नाशिक येथील वरिष्ठांशी चर्चा करण्यासाठी रवाना झाले होते. काळे यांनी इशारा दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांसमवेत पाटबंधारे विभागाच्या राहाता उविभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

उपविभागीय अभियंता गोटमवार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून काळे यांनी संपर्क साधून आंदोलनाच्या परिस्थितीची जाणीव करून दिली. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेलेला असून, सर्व शेतकरी रब्बी हंगामाच्या आशेवर आहेत. जर शेतक-यांना शेतीसाठी पाणी मिळाले नाही तर परिस्थिती चिघळू शकते याचे भान पाटबंधारे विभागाने ठेवावे. तसेच सर्वांना पाणी द्यावे, अशी मागणी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)