कोपरगावात अज्ञात आजाराने शाळकरी मुलाचा मृत्यू 

कोपरगाव- शहरातील दत्तनगर भागातील शाळकरी मुलाचा अज्ञात आजाराने तीन दिवसांत मृत्यू झाला. अमन अस्लम शेख (वय 15) असे या मुलाचे नाव आहे. अमन शेख हा शहरातील दत्तनगरमधील झोपडपट्‌टी भागात राहत होता. तो श्रीमान गोकुळचंद विद्यालयात इयत्ता 10 वीमध्ये शिक्षण घेत होता. शनिवारी रात्री अमन शेख याला अचानक उलटया सुरू झाल्या. त्याच्यावर शहरातील खाजगी रूग्णालयात तात्पुरता उपचार करून घरी पाठवले. परंतू सकाळी जेवण करीत असताना अमन अचानक चक्कर येवुन बेशुध्द अवस्थेत खाली कोसळला.

त्याला शहरातील डॉ. आदीक हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार सुरू करण्यात आला, मात्र उपचाराला योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने त्यास आत्मा मालीक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील डॉक्‍टरांनी शिर्डी येथे उपचारासाठी दाखल करण्याची सुचना केली. शिर्डी येथे आल्यानंतर मात्र त्याची प्रकृती अधिकच खालावत गेली.त्यानंतर त्याला रविवारी नाशिकच्या खाजगी रूग्णालयात दाखल केले. मात्र सोमवारी पहाटे उपचारादरम्यान अमनचा मृत्यू झाला.

अमनच्या अचानक झालेल्या मृत्यूने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान अपक्ष नगरसेवक मेहमुद सय्यद यांनी नगरपालीकेच्या कारभारावर टीका केली. दत्तनगर भागात कोणत्याही नागरी सुविधा नाहीत, उघडया तुंबलेल्या गटारी, डुकरांचा सुळसुळाट, शहरात औषध फवारणी नाही, कोणतेच काम पालीकेकडून वेळेत होत नाहीत. अतंर्गत राजकारणामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, अशी खंत व्यक्त करीत पालीकेच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला.

या भागात अनेक नागरीक विविध आजाराने त्रस्त झाले आहेत. या आजारांनी काहींचा मृत्यू झाला तरीही पालीका प्रशासन आपला राजकीय वाद मिटवून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत नाही, अशी टीका मयत अमन शेखचे नातलग व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आजीज शेख यांनी केली आहे. गेल्यावर्षी साथीच्या रोगाने शहरात थैमान घातले होते. संजयनगर, सुभाषनगर भागातील अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शेख याच्या मृत्यूचे कारण शोधून त्या आजाराचा प्रादूर्भाव इतरांवर होऊ नये यासाठी खबरदारी आरोग्य विभागाने व पालीका प्रशासनाने घेणे आवश्‍यक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)