पाटग्रस्त शेतकऱ्यांची प्रशासनाशी जुंपली

अकोले : पाटग्रस्त शेतकऱ्यांनी चाऱ्यांचे काम बंद पाडून जेसीबी मशित ताब्यात घेतले.

दुसऱ्या दिवशीही पाडले कालव्यांचे काम बंद : कालवे बंदीस्त करण्याची मागणी

अकोले  – निळवंडे धरणाच्या कालवे खोदाईवरून सोमवारी (दि. 26) पुन्हा एकदा रणकंदन माजले. सलग दुसऱ्या दिवशीही सुरू असणारे कालवे खोदाईचे काम बंद पाडून पाटग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या मागणीसाठी जेलमध्ये जाऊ, असा पवित्रा घेतला. तसेच कुंभेफळ, वाशेरे, खानापूर व अन्य ठिकाणी सुरू असलेले कालवे खोदाईचे काम बंद पाडले. त्यामुळे पाटग्रस्त शेतकरी व शासनात चांगलीच जुंपल्याचे चित्र पुढे आले आहे.

आंदोलकांनी आज पुन्हा कालव्यांचे काम बंद पाडले. यावेळी आंदोलकांनी जमीन आमच्या बापाची, नाही कोणाच्या बापाची, कोण म्हणतो थांबणार, नाही काम बंद केल्याशिवाय जाणार नाही, अशा घोषणा दिल्या. यावेळी दोन जेसीबी व तीन डंपरचा ताबा घेऊन या आंदोलकांनी काम करणाऱ्यांना हुसकावून लावले.

सुरुवातीला या आंदोलकांनी शासनाचे प्रतिनिधी व अधिकाऱ्यांना सुपीक जमिनीतून बंदिस्त कालवे न्यावेत व आम्हाला भूमिहीन होण्यापासून वाचवावे, अशी मागणी केली. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे काम बंद पाटले. या आंदोलकांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

कामाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र बागुल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी काम सुरू झाले असावे, अशी प्रतिक्रिया देऊन माहिती देण्याबाबत असमर्थता दर्शवली. हे कालवे झालेच पाहिजेत, अशी प्रतिक्रिया नानासाहेब जवरे यांनी दिली. ते म्हणाले, भूसंपादनाच्या रकमा या शेतकऱ्यांनी घेतल्या. आता कामाला विरोध करत आहेत. या कालव्यांसाठी आलेला निधी परत जाण्याची भीती आहे. या कालव्यामुळे सर्वांचाच फायदा होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)