ग्रोवर व रुबेला लसीकरण मोहीमेच्या जनजागृतीसाठी फेरी

श्रीरामपूर – ग्रोवर व रुबेला लसीकरण मोहीमेच्या जनजागृतीसाठी शहरातून शालेय विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली. केंद्र व राज्य सरकार, आरोग्य विभाग व शिक्षण विभागाच्यावतीने गोवर रुबेला लसीकरण मोहीमेचे आयोजन दि. 31 डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. त्याची जनजागृती करण्यासाठी नगरपालिका व नागरी आरोग्य केंद्राच्यावतीने शहरातून विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली.

मेनरोड, गांधी पुतळा, शिवाजी चौक, नगरपालिका अशी फेरी काढण्यात आली. या फेरीत आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे, शिक्षण अधिकारी ज्ञानेश्वर पटारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पऱ्हे, आरोग्य विभागाचे रमेश अपिल आदी सहभागी झाले होते.

-Ads-

नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, मुख्याधिकारी बाबुराव बिक्कड यांनी फेरीला शुभेच्छा दिल्या. फेरीत नगरपालिका शाळा, खटोड कन्या विद्यालय व सोमैय्या विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)