गॅसच्या स्फोटात घर व संसार खाक

सुपेकरवाडी येथील घटना; सहा लाखांचे नुकसान

कर्जत – तालुक्‍यातील सुपेकरवाडी येथील बाबुराव तुकाराम सुपेकर यांच्या राहत्या घरात गॅसचा स्फोट होऊन छप्पर जळून खाक झाले. या आगीत सर्व संसारोपयोगी साहित्य तसेच कागदपत्रे जळाली. सोमवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.

-Ads-

सुपेकरवाडीनजीक राहत असलेल्या सुपेकर यांच्या छपराच्या घरात सोमवारी दुपारी गॅसचा अचानक स्फोट झाला. सुरुवातीला आगीची तीव्रता कमी असल्याने, कुटुंबातील सदस्यांनी घराबाहेर धाव घेतली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या आगीत घरातील कपाट, दागिने, रोकड रक्कम, कागदपत्रे तसेच मोठ्या प्रमाणावरील धान्याचा साठा जळून खाक झाला. मोठ्या कष्टातून पिकवलेल्या मोठ्या प्रमाणावरील कापसाचा साठा या आगीत भस्मसात झाला. या आगीत सुमारे 20 क्विंटल कापसासह बाजरी, ज्वारी, गहू, भुईमूग, हरभरा आदी धान्य तसेच पिकांची खते जळाली. यामध्ये सुपेकर कुटुंबीयांचे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले.

तलाठी प्रशांत जमदाडे यांनी जळीत मालाचा पंचनामा केला. गॅस कंपनीतर्फे घटनास्थळाला भेट देण्यात आली. सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने सुपेकर कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या कुटुंबासाठी महसूल विभाग तसेच गॅस कंपनीकडून भरपाई मिळण्याची मागणी होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)