लोकप्रतिनिधींनी पाटपाण्याचे वाटोळे केले : शंकरराव गडाख

चांदा : नेवासा तालुक्‍यातील पाटपाण्याचे नियोजन पुर्णतः कोलमडले असून शेतकऱ्यांविषयी आत्मियता नसलेल्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना ऐन दुष्काळात उध्दवस्त करण्याचे काम केले आहे. इतर धरणातून तीन तीन आवर्तने होत असताना, मुळा धरणातून फक्त एकच आवर्तन असल्याने शेतकरी दुष्काळाने होरपळणार आहे. यासाठी आता आपण सर्वानी एकत्र येऊन हक्काच्या पाण्यासाठी प्रखर लढा उभारावा लागणार आहे असे प्रतिपादन माजी आमदार शंकरराव गडाख यांनी केले.

नेवासा तालुक्‍यातील चांदा येथील मुळाचे संचालक बाबुराव चौधरी यांच्या वस्तीवर आयोजित दिवाळी फराळाच्या निमित्ताने उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी युनाटेड रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष अशोकराव गायकवाड होते.

यावेळी पंचायत समिती सभापती कल्पना पंडीत, मुळाचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, माजी सभापती कारभारी जावळे, भाऊसाहेब मोटे, जिल्हा परिषद सदस्या सविता अडसुरे, पंचायत समिती सदस्या पार्वतीबाई जावळे उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद निधीतील विविध विकास कामांचा प्रारंभ प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी अशोकराव गायकवाड, सभापती कल्पनाताई पंडीत, डॉ. विनोद गुंदेचा, माजी पंचायत समिती सदस्य अनिलराव अडसुरे, एकनाथ भुजबळ आदिंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मुळाचे संचालक बाबुराव चौधरी, प्रकाश भालके, मच्छिंद्र डाके, नवनाथ चव्हाण आदि उपस्थित होते. माजी सभापती कारभारी जावळे यांनी प्रस्ताविक केले. ऍड. समिर शेख यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)