चाराटंचाईने कर्जत तालुक्‍यात जनावरांची होरपळ

जानेवारीपर्यंत पुरेल एवढाच चारा उपलब्ध; शासन निर्णयाची प्रतीक्षा

शेळ्या मेंढ्यांची भटकंती

चाऱ्याच्या टंचाईमुळे शेळ्या मेंढ्यांची रानोमाळ भटकंती सुरू आहे. पाऊस न झाल्याने ऐन पावसाळ्यातही गवताचा चारा उपलब्ध झाला नाही. माळरानावर पावसाअभावी जळून गेलेले गवत खात शेळ्या मेंढ्यांची गुजराण सुरू आहे. नव्याने जन्मलेल्या कोकरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

कर्जत – कर्जत तालुक्‍यात दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्‍यातील 1 लाखाहून अधिक पशुधनाला दुष्काळाच्या तीव्र झळा बसण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जनावरांची सध्या होरपळ सुरू असल्याचे तालुक्‍यात चित्र आहे. या स्थितीत शासनाकडून पशुधन जपण्यासाठी कोणता निर्णय घेतला जातो याकडे पशुपालकांचे लक्ष लागून राहिले आहे.

टंचाईच्या काळात कृषी तसेच पशुसंवर्धन विभागातर्फे जनावरांची संख्या व उपलब्ध चाऱ्याचा साठा यावर विशेष लक्ष पुरविले जाते. विभागामार्फत शासनाला टंचाईबाबतचा अहवाल सादर केला जातो. पशुसंवर्धन विभागाने शासनाला पाठविलेल्या अहवालानुसार जानेवारी महिन्यापर्यंत चारा पुरेल अशी स्थिती आहे. त्यामुळे जून 2019 पर्यंत पशुधन जपणे अवघड होणार आहे. कर्जत तालुक्‍यात जवळपास 1 लाख 15 हजार जनावरे आहेत. शेळया मेंढयांची संख्या 90 हजार एवढी आहे. तालुक्‍यात दिवसाला 12 हजार 900 टन इतका चारा लागतो. जनावरांसाठी दररोज सरासरी 12 ते 20 किलो इतक्‍या चाऱ्याची आवश्‍यकता असते. सध्या अंदाजे 1 कोटी 70 लाख मेट्रिक टन चारा तालुक्‍यात उपलब्ध आहे. दुष्काळामुळे उपलब्ध चाराही घटणार आहे.

तालुक्‍यात कमी पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले. रब्बी हंगामातही पावसाने हुलकावणी दिल्याने, हंगामही संकटाच सापडला, त्यामुळे जनावरांना कडबा मिळणार नाही. तालुक्‍यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळी परस्थिती असुन पावसाअभावी पिकांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे जनावरांना जगविण्याचा मोठा प्रश्‍न आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)