लाळ्या-खुरकुताने तीन गायी तर, एक म्हैस दगावली

तेलकुडगाव येथील लाळया खुरकत आजाराने दगावलेली गाय व शेतकरी.

शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना; प्रशासनाचे दुर्लक्ष : लसीकरण करण्याची मागणी

नेवासे – नेवासे तालुक्‍यासह तेलकुडगाव देडगाव देवसडे, जेऊर व पाचुंदे परिसरात लाळया खुरकुताने जनावरांना चांगलाच विळखा घातला आहे. तेलकुडगाव-देडगाव शिवारात एकनाथ सखाराम गायकवाड यांच्या तीन जर्शी गायी व एक म्हैस (अंदाजे किंमत 2-3 लाख रुपये) लाळया खुरकुत आजाराने एक-दोन दिवसाच्या फरकाने दगावल्याची घटना घडली.

यामुळे पशुपालक शेतकऱ्यांमध्ये लाळया खुरकुताविषयी घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाला व वैद्यकीय अधिकाऱ्यांना वारंवार बोलवून देखील जाणीवपूर्वक टाळटाळ केल्याने ही घटना घडल्याचा आरोप परिसरातील शेतकरी करीत आहेत. सध्या या परिसरात दुभत्या जनावरांसह अन्य जनावरांना लाळया खुरकुत या आजाराने विळखा घातला आहे. शेतकऱ्यांना ऐन दुष्काळाच्या तोंडावर जनावरांचा वैद्यकीय खर्च हा न पेलवणारा आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसल्याने दुष्काळात कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. मात्र, प्रशासन सुस्त असून, तालुक्‍यासह तेलकुडगाव, देवसडे, जेऊर, देडगाव परिसरात जनावरांना लाळया खुरकुताचे लसीकरण पूर्वीच होणे अपेक्षित होते. मात्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी लसीकरण व लाळया खुरकुताची माहिती शेतकऱ्यांना दिली असती तर, आजाराची लागण एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली नसती. त्वरित या परिसरात लाळया खुरकुताचे लसीकरण जनावरांना करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे, अन्यथा आंदोलनाचा इशारादेखील देण्यात आला आहे.

तेलकुडगावमध्ये पशूवैद्यकीय दवाखान्याची मागणी

तेलकुडगाव हे अडगळीत असलेले गाव असून येथील शेतकऱ्यांची शेतीला जोडधंदा म्हणून दुध धंदा असल्याने गावात महागड्या जनावराची संख्या भरपूर असून येथे आजाराची लागण होण्यास वेळ लागत नाही. खासगी पशुवैद्य मनपसंत शेतकऱ्यांची लूट करत असल्याने येथील शेतकरी व पशुवैद्यकीय दवाखान्याची मागणी तुळशीराम काळे यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)