विधायक कामे करताना पक्ष अभिनिवेश नको : भास्करगिरी महाराज

नेवासा फाटा  – नेवासा तालुक्‍यातील मुरमे (देवगड) ग्रामस्थांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची नुकतीच भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. गावाच्या विकासासाठी एकोपा कायम ठेवा. विधायक कामे करताना पक्षाच्या चष्म्यातून कधीही पाहू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मुरमे ग्रामस्थांच्या वतीने सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. भास्करगिरी महाराजांचे टाळ-मृदंगाच्या गजरात व फटाक्‍यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले. काशिनाथ वरखडे, सरपंच अजय साबळे यांनी संतपूजन केले. सोहळा समितीच्या वतीने योगदान देणाऱ्यांचा भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

भास्करगिरी महाराज म्हणाले, संतांच्या संगतीत मनुष्य जीवनाचा उद्धार होतो. भक्ती फलद्रुप होण्यासाठी निर्धार व निश्‍चयाने भक्तीचे फाउंडेशन मजबूत करा. गोमतेची सेवा करून तिचे रक्षण करा. दहा माणसांचे पोट भरू शकेल, एवढी धमक अंगात ठेवा. माजी आ. शंकरराव गडाख यांनी दत्त जयंती सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी योगदान देऊन या क्षेत्राचे वैभव वाढीसाठी प्रयत्न करावा, असे आवाहन केले.

कीर्तन प्रसंगी नारायण महाराज ससे, गिरीजीनाथ महाराज जाधव, तंटामुक्तिचे अध्यक्ष अप्पासाहेब वरखडे, पंढरीनाथ मिस्तरी, बाबासाहेब महाराज सातपुते, मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, लक्ष्मण महाराज नांगरे, दादा महाराज साबळे, आबासाहेब तनपुरे यांच्यासह बकुपिंपळगाव, मडकी, खलालपिंप्री, जळके, गोधेगाव येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना दामोदर साबळे व मारुती साबळे यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)