संगणक परिचालकांचा मंगळवारी विधानभवनावर मोर्चा

शेवगाव – आपले सरकार प्रकल्पात काम करणाऱ्या राज्यातील संगणक परिचालाकांना कायमस्वरूपी नियुक्ती मिळावी, या मागणीसाठी मंगळवारी (दि. 27) संघटनेच्या वतीने विधानभवनावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शेवगाव तालुका संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष संतोष पावसे, संतोष मगर, सचिव कृष्णा जगताप यांनी दिली.

संघटनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपले सरकार सेवा केंद्राचे काम प्रामाणिकपणे केल्यामुळे राज्य शासनाला सलग तीन वेळा केंद्र शासनाचा ई-पंचायतीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. राज्यातील ग्रामपंचायतींचे सर्व ऑफलाइन व ऑनलाइन कामे संगणक परिचालक अखंडित पार पडतात. ग्रामपंचायत प्रशासन देखील संगणक परिचालकांच्या वेतनाविषयी सकारात्मक नाही. परिचालकांना वर्ष वर्ष मानधन मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मानधनही केवळ 6 हजार रुपय आहे. त्यामुळे संगणक परिचालकांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनावर संतोष पावसे, संतोष मगर, संदीप गादे, कृष्णा जगताप, अरुण शिंदे, मनोज खराडे, अरुण शिंदे, सतीश खेळकर, तुकाराम शिंगटे, सुनीता आमटे, कालिंदा नलगे आदींच्या सह्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)