राष्ट्रीय कराटे स्पर्धेत ‘समता’च्या विद्यार्थ्यांचे यश

कोपरगाव – निहॉन शोतोकॉन कराटे असोसिएशनद्वारा घेण्यात आलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले. सुरत (गुजरात) येथील डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी कम्युनिटी हॉल येथे या स्पर्धा झाल्या. स्पर्धेत 22 राज्यांतील 800 स्पर्धक सहभागी झाले होते. राज्यातून 52 स्पर्धकांनी सहभाग घेतला.

कता व कुमीते या प्रकारात समताच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत सुवर्ण व कांस्यपदकांची लयलूट केली. अद्वैता भोसले हिने कुमिते व काता या दोन्ही प्रकारांत सुवर्ण पदके पटकावली. तन्वी लालसरे, माही संचेती यांनी सुवर्णपदके पटकावली. ईशान वर्पे यांनी कुमिते प्रकारात कांस्य व काता प्रकारात सुवर्णपदक मिळविले. नूतन लाहोटी, नंदिनी वर्मा, अनन्या मुंदडा यांनी कुमितो प्रकारात कांस्य पदक पटकावले.

-Ads-

नंदिनी वर्मा हिने काता प्रकारातही कांस्य पदक पटकावले. विद्यार्थ्यांना समता स्कूलच्या कराटे प्रशिक्षिका निलोफर शेख यांचे मार्गदर्शन लाभले. समता स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे, सुहासिनिताई कोयटे, प्राचार्या उषा मूर्ती व सर्व शिक्षकवृंदाने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.विजेत्यांना जपान येथील ग्रॅंडमास्टर तकीयो नानाहोशी यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष कल्पेश मकवाना, महाराष्ट्र कराटे संघटनेचे अध्यक्ष सुदर्शन पांढरे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)