मुस्लिम समाजातर्फे आरक्षणाची मागणी

पाथर्डी – मुस्लिम समाजाला शासकीय सेवांमध्ये व शैक्षणिक संस्थांमध्ये पाच टक्के आरक्षण मिळावे अशी मागणी जमियात ए उलमा संघटनेच्या पाथर्डी शाखेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

मुख्यमंत्री फडणवीस यांना पाथर्डी तहसीलदारांमार्फत पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने सन 2014 चे शासन निर्णयानुसार राज्यातील शासकीय निमशासकीय सेवांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात अध्यादेश जारी करून अधिनियमामध्ये विशेष तरतूद केली होती. परंतु संबंधित अध्यादेश सहा महिन्याचे आत विधिमंडळाने पारित न केल्याने तो अध्यादेश व शासन निर्णय अधिक्रमित झालेला आहे.

याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सदर अध्यादेशावर निर्णय देताना मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण शैक्षणिक क्षेत्रामध्ये देणे योग्य असुन काळाची गरज असल्याचा निर्वाळा दिलेला आहे. परंतु आजपर्यंत राज्य शासनाने मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण दिलेले नाही .

भारतीय आरक्षणाच्या बाबींचा विचार करून राज्यातील शैक्षणिक व सामाजिक मागासलेल्या समाजासाठी भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार विशेष मागास प्रवर्ग निर्माण करून त्यामध्ये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्‌या मागासलेल्या मुस्लिम गटाचा समावेश करण्यात यावा, भारतीय शासकीय निमशासकीय सरळ सेवा भरतीमध्ये सध्या राज्यात अस्तित्वात असलेल्या आरक्षणा व्यतिरिक्त पाच टक्के आरक्षण नव्याने निर्माण करण्यात आलेल्या विशेष मागास शालेय उच्च व तंत्रशिक्षण वैद्यकीय शिक्षण कृषी व पशुवैद्यकीय विभागाअंतर्गत शासकीय तसेच खासगी अनुदानित व विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश सध्या राज्य अस्तित्वात असलेल्या आरक्षणा व्यतिरिक्त पाच टक्के आरक्षण देण्यात यावे अशा विविध मागण्या संघटनेच्या वतीने निवेदनात करण्यात आल्या आहेत.

या निवेदनावर अल्पसंख्यांक कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नासिर शेख, मौलाना शफिक शेख, अहमद शेख, नासिर शेख, फारूक शेख, जावेद पठाण, मुन्ना शेख, असिफ पठाण, समीर शेख, असिफ पठाण,सरफराज पटेल, नसीर शेख, अक्रम आतार, जब्बार आतार, तोफीक पठाण, वाजिद शेख, मिराज खान ,रिजवान पठाण आदींच्या सहया आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)