आखतवाडे सेवा संस्थेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम, अध्यक्षपदी उगले

शेवगाव – तालुक्‍यातील आखतवाडे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी गणेश गुलाबराव उगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब रामनाथ उगले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी संस्थेच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षपदासाठी गणेश उगले यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी विखे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

सचिव कल्याण वाघ यांनी निवड प्रक्रियेसाठी सहकार्य केले. उगले यांच्या अर्जावर माणिक बांगर यांनी सूचक म्हणून तर रघुवीर उगले यांनी अनुमोदक म्हणून सह्या केल्या. या वेळी रघुवीर उगले, माणिक बांगर, बाळासाहेब उगले, मुरलीधर राशीनकर, विठ्ठल रामकिसन उगले, शंकर राशीनकर, जिजाबाई मोहन उगले, अशोक दसपुते, विठ्ठल साळवे, खुशाल औताडे, विठ्ठल विश्वनाथ उगले, भाऊसाहेब वाघमारे आदी संचालक उपस्थित होते. पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले यांचे हस्ते उगले यांचा सत्कार करण्यात आला.

-Ads-

या वेळी डॉ. घुले म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रगतीत प्रत्येक गावातील सेवा सोसायटीची भुमिका महत्वाची असते. सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी नेहमी प्रयत्नशील राहावे. अलीकडच्या काळात वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकरी संकटात आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून त्यांना दिलासा देण्याची गरज आहे.

या प्रसंगी ऍड. बाबासाहेब उगले, ज्ञानेश्वर उगले, दादासाहेब उगले, माजी सरपंच रवींद्र राशीनकर, नितीन बनकर, परसराम उगले, सुनील उगले, संभाजी उगले, नीलेश उगले, अजित उगले, सुधाकर उगले, रामेश्वर उगले आदींसह संस्थेचे सभासद शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)