महापालिकेने फिरविली कचरा विलगीकरणाकडे पाठ

साफसफाई, कचऱ्यावर कोट्यवधींची उधळण : जागोजागी पडले कचऱ्याचे ढीग; नगरकरांचे आरोग्य धोक्यात

मुख्य रस्त्यांलगत कचरा!

कचरा उचलण्यासाठी महापालिकेने स्वत:च्या मालकीच्या वाहनांसह कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराची वाहने आहे. नागरिकांच्या घरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी घंटागाड्यांची व्यवस्था आहे. कचऱ्याच्या मुद्यावर एवढा लवाजमा असताना मुख्य रस्त्यांलगत कचरा साचल्याचे किळसवाणे चित्र पाहावयास मिळते. इंधनावर होणारा खर्च वाचवून स्वत:चे खिसे जड करण्याच्या प्रकारातून काही घंटागाडी चालक प्रभागातील खुल्या जागा, ओसाड जागेवर कचरा टाकून मोकळे होत आहेत.

नगर – स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यात राबविल्या जाणाऱ्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत कचऱ्याचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेकडे महापालिकेने पाठ फिरविल्याची परिस्थिती आहे. मुख्य रस्त्यांलगत घाण व कचऱ्याचे किळसवाणे चित्र पाहावयास मिळत आहे.

घरांमधून जमा केला जाणारा कचरा असो वा प्रभागांमधील साफसफाईवर महिन्याकाठी कोट्यवधींची उधळण होत असली, तरी घनकचऱ्याची समस्या जैसे थे’ असल्याची परिस्थिती आहे. यामुळे महिन्याकाठी खर्च होणारा पैसा नेमका कोणाच्या घशात जातोय, असा सवाल नगरकर उपस्थित करीत आहेत.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत 2015 ते 2017 या कालावधीत महापालिकेच्या स्तरावर नागरिकांचा शोध घेऊन त्यांना वैयक्तिक स्तरावर शौचालय बांधून देण्याची मोहीम पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनाने शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे ओला व सुका असे विलगीकरण करण्यासाठी मे 2017 पासून कचरा लाख मोलाचा मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते.

कचऱ्याचे विलगीकरण न केल्यास महापालिकांचे अनुदान बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता. शासनाचा अल्टीमेटम कधीचाच संपुष्टात आला असला, तरी अद्यापही स्वायत्त संस्थांचे अनुदान बंद करण्यात आले नाही, हे येथे उल्लेखनीय. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने कचरा विलगीकरणाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

महापालिका पदाधिकारी, नगरसेवकांच्या आग्रहापोटी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची नियुक्‍त करण्यात आली. कंत्राटी पद्धतीने देखील सफाईकामगार आहे. शहरात कचरा संकलन करणारी वेगळी यंत्रणा आहे. त्यानंतर कचऱ्यावर प्रक्रिया करणारी वेगळी यंत्रणा तसेच शहर स्वच्छतेसाठी महापालिकेची यंत्रणा यावर कोट्यवधी रूपये दरमहिन्याला खर्च होत आहे.

विशेष म्हणजे महापालिकेली अधिकारी व पदाधिकारी आपल्या सोईनुसार या ठेकेदारांना त्यांची बिल देत आहे. त्यामुळे ठेकेदारही मनमानी पद्धतीने काम करीत आहे. यावर कोट्यवधी खर्च केले जात असले, तरी प्रभागात अस्वच्छता कायम असल्याचे चित्र आहे. नाल्या, लहान-मोठे सर्व रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने आदींची नित्यनेमाने साफसफाई होणे अपेक्षित असताना आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मनपाला ठेंगा दाखविल्याची परिस्थिती आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)