शहरटाकळीत पोलीस औट पोस्ट सुरू करावे 

मागणी मान्य न झाल्यास आंदोलन – अॅड. मडके

भावीनिमगाव – शेवगाव तालुक्‍यातील शहरटाकळी परिसरात वाढत्या चोरीच्या घटना व अवैध धंदे यांना रोखण्यासाठी येथील पोलीस औट पोस्ट सुरू करावे अशी मागणी शहरटाकळी सेवा सोसायटी अध्यक्ष अॅड. अनिलराव मडके यांच्या नेतृत्वाखाली शहरटाकळी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास ढिकले यांच्याकडे केली.

-Ads-

या निवेदनात म्हटले आहे, शेवगाव तालुक्‍यातील शहरटाकळी येथील पोलीस औट पोस्ट अनेक वर्षांपासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे परीसरात अवैध धंद्याबरोबर चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पोलिसांची रात्रीची गस्त ही कधी कधी होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून येत आहेत.

अनेक वर्षांपासून बंद करण्यात आलेले शहरटाकळी औट पोस्ट पुर्ववत सुरू करावे यासाठी शेवगाव तालुका पोलीस स्टेशनकडे मागणी केली आहे. ग्रामपंचायतकडे पोलीस चौकीसाठी जागा उपलब्ध आहे. आठ दिवसांत काही निर्णय झाला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे शहरटाकळी सेवा सोसायटी अध्यक्ष ऍड. अनिलराव मडके यांनी सांगितले.

“शहरटाकळी ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये पोलीस औट पोस्टचे कामकाज करावे. अशा आशयाचा ठराव ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाचा जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. तरी पोलीस निरीक्षकांनी ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये तातडीने कामकाजास सुरुवात करून कायमस्वरूपी एका उपनिरीक्षकासह कर्मचारी नेमणूक करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देऊन नागरिकांना आंदोलन करण्यास भाग पाडु नये.
-आण्णासाहेब शिंदे , माजी सरपंच, शहरटाकळी.

निवेदनावर माजी सरपंच अण्णासाहेब शिंदे, सेवा सोसायटी उपाध्यक्ष प्रशांत वेलदे, शिवाजीराव मडके, दिलीप राजळे, मनोहर गवळी, दिलीप राजळे, प्रदीप गवळी, राजेंद्र बरबडे, संतोष शेटे, शिरीष कावले, मारुती कावले, भाऊसाहेब राजाळे, कडुबाळ घुले, राजु खंडागळे, रामप्पा गिरम, राजेद्र काकडे, शाहाजी बोरूडे, बाळासाहेब खंडागळे, रावसाहेब शेळके, पंढरीनाथ कोल्हे, आबा गादे, किशोर कावले, शिवाजी दळवी आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)