‘पेन्शनर्स’ भाजप विरोधात मतदान करणार

पेन्शन धारकांचा दिल्लीला देशव्यापी संप

नगर – ईपीएस 95 पेन्शन धारकांची पेन्शन वाढ व इतर प्रश्‍नांसाठी दिल्ली देशव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. पेन्शनर्सचे मागण्यासाठी वारंवार आश्‍वासन दिल्यात आली परंतू आता प्रश्‍न न सुटल्यास 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देशातील सर्व पेन्शनर्स भाजप विरोधात मतदान करणार असल्याचा इशारा देण्यात आला.

दिल्ली मोर्चाच्या नियोजनार्थ महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ व एसटी निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकित जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पेन्शनर्सना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. तत्पुर्वी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या भेटीला शिष्टमंडळ जाणार असल्याचे सांगण्यात आले.

ऑल इंडिया कोऑर्डिनेशन कमिटी, ईपीएस 95 पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने दिल्ली येथील संसद भवनावर दि. 19 डिसेंबर रोजी देशव्यापी मोर्चा काढला जाणार आहे. त्याच्या नियोजनार्थ टिळक रोड येथील श्रमिक भवनात एसटी निवृत्त कर्मचारी संघटनेचे सचिव रमेश गवळी यांच्या अध्यक्षतेखाली तर श्रमिक महासंघाचे चिटणीस कॉ.आनंदराव वायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी नवनाथ साबळे, अर्जुन बकरे, बळभिम कुबडे, देवीदास साळुंके, पुरुषोत्तम जोशी, भाऊसाहेब इथापे, भास्कर गायकवाड, जी.आर. भागवत, विठ्ठल पठारे, सुरेश चिपाडे, नारायण पवार आदींसह जिल्ह्यातील पेन्शनर्स उपस्थित होते.

वायकर म्हणाले, भगतसिंह कोशीयारी समितीच्या शिफारसी लागू झाल्यास पेन्शनर्सना न्याय मिळणार आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कोशीयारी समितीच्या शिफारसी लागू करण्याचे दिलेले आश्‍वासन पाळले नाही. काही महिन्यातच लोकसभेची आचारसंहिता लागणार आहे. भाजप सरकारने पेन्शनर्सना झुळवत ठेवले असून, देशातील 65 लाख तर महाराष्ट्रातील 12 लाख पेन्शनर्स भाजप विरोधात मतदान करणार असल्याची भुमिका त्यांनी मांडली. तसेच पेन्शनर्सच्या हक्कासाठी उभे राहिलेल्या देशव्यापी आंदोलनाच्या 25 वर्षाचा त्यांनी आढावा घेतला.

रमेश गवळी यांनी सहकार क्षेत्राचे सर्वात मोठे जाळे असलेल्या नगर जिल्ह्यात पेन्शनर्सची संख्या सर्वाधिक आहे. या देशव्यापी मोर्चात नगर जिल्ह्यातील पेन्शनर्स मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. काही संघटना पेन्शनर्सचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मेळावे घेऊन सभासदांकडून वर्गणी जमा करुन पैसे उकळण्याचा धंदा करीत आहे. महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ व एसटी निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने सभासदांकडून कुठल्याही प्रकारची वर्गणी घेतली जात नाही.

कोणत्याही संघटनेच्या सभासदाला पेन्शन मिळण्यास अडचण येत असल्यास त्यांनी या संघटनेकडे पाठपुरावा करण्याचे त्यांनी सांगितले. पेन्शनर्सना कोणत्याही संघटनेला वर्गणी न देण्याचे आवाहन केले. या बैठकित उपस्थित पेन्शनर्सना हयातीचे दाखले न दिल्यास पेन्शन बंद होणार असल्याचे स्पष्ट करुन, हयातीचे दाखले ऑनलाईन सादर करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)