शेवगाव – हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने शेवगाव येथील मदरसा रियाजुल ऊलुममध्ये विद्यार्थ्यांना तसेच ग्रामीण रुग्णालयातील रूग्णांना फळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी मदरसामध्ये आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते वहाब शेख म्हणाले, आपल्या जीवनात हजरत पैगंबरांनी स्वतःच्या वर्तनाने जगासमोर मोठा आदर्श निर्माण केला. सचोटी, दया, करूणा इमानदारी या तत्त्वाचा पुरस्कार केला. महिलांना आदराचे स्थान दिले. वेळप्रसंगी धर्मयुद्ध सुद्धा त्यांना करावे लागले परंतु हे करताना त्यांनी नियमांचे पालन केले.
जगाला शांती व समतेचा संदेश दिला. आदर्श जीवन कसे असावे याचे मूर्तिमंत उदाहरण जगासमोर घालून दिले.
यावेळी इम्रान शेख, आजीम काझी, पत्रकार निजाम पटेल, गुडू काझी, सरपंच मुजमिल पटेल, राजू सय्यद, अरबाज शेख, फैजल शेख, समिर शेख, सोहेल काझी, इरफान खान, चांद पठाण, तुफेल मुलानी आदी उपस्थित होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा