काळ भैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त आगडगावला आजपासून सप्ताह

नगर – काळ भैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त आगडगाव येथील भैरवनाथ ट्रस्ट व आगडगाव, टोकेवाडी ग्रामस्थांच्या वतीने हरिणाम सप्ताह व काशिखंड पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार (ता. 23) पासून या कार्यक्रमास प्रारंभ होऊन जन्मोत्सवाचा मुख्य कार्यक्रम 29 नोव्हेंबर रोजी रात्री होईल.

या सप्ताहांतर्गत शुक्रवारपासून रोज सायंकाळी सात वाजता अनुक्रमे ज्ञानेश्वर कराळे, ज्ञानेश्वर कदम, स्वप्नील पवार, शिवाजी देशमुख, पारस मुथ्था, आक्रुर साखरे, बाबासाहेब इंगळे, केशवदाद उखळीकर आदी महाराजांचे कीर्तन होतील.

शुक्रवारी (ता. 30) सकाळी साहेबराव कांगुने महाराजांचे काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता होईल. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित रहावे,असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)