रस्ता लुट करणारी टोळी हत्यारासह गजाआड 

राहाता – रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडवून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी नाकाबंदी करून जेरबंद केले. त्यांचेकडून दरोडा व लूटमारीसाठी वापरण्यात येणारे हत्यारे व मोटारसायकल जप्त केली.
मंगळवारी (दि.20) मध्यरात्रीनंतर रात्री 2 वाजेच्या सुमारास राहाता पोलीस नगर मनमाड महामार्गावर रात्रीची गस्त घालत असताना गस्तीवरील पोलिसांना महामार्गावर तीन मोटारसायकलवरून सहा ते सातजण संशयतरीत्या फिरत असल्याची माहिती अहमदनगर कंट्रोलकडून मिळाली.

यानंतर राहाता पोलिसांनी नाकाबंदी केली. या दरम्यान लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी मोटारसायकल वरून सहा ते सात इसम निर्मळ पिंपरी शिवारातून भरधाव वेगात शिर्डीकडे येत असल्याचे राहाता पोलीसांना कळवले.

राहाता पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण परदेशी यांनी पोलीस ठाण्याजवळील भडांगे यांचे चहाचे दुकान समोर बॅरेगेटींग करून नाकाबंदी केलेली असताना रात्री दोन वाजून तीस मिनिटाचे सुमारास नगरकडून शिर्डीकडे भरधाव वेगाने मोटार सायकल जात असताना पोलिसांना त्यांना थांबण्याचा इशारा केला असता, त्यातील एका मोटरसायकलस्वाराने त्याची मोटर सायकल पूर्वेकडे घेतली असता मोटर सायकल वेगाने डिव्हायडरला जोरात आदळून रोड वरून घसरत जाऊन आरोपी खाली पडले, त्याचा फायदा घेत त्यांच्यासोबत असलेले इतर दोन मोटार सायकल स्वार निघून गेले. मोटारसायकलवरून पडलेल्या तिघांपैकी एकास जास्त मार लागलेला दिसत असल्याने त्या तिघांना ताब्यात घेतले.

त्याचवेळी लोणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील व सहकारी घटनास्थळी आले. त्यांनी व पोलीस निरीक्षक अरुण परदेशी यांनी शिर्डीच्या दिशेने मोटारसायकलवर भरधाव वेगाने गेलेल्या संशयितांचा पाठलाग करून साकुरी शिवाजवळ पकडले. पकडलेले आरोपीकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, नंतर मात्र पोलिसी खाक्‍या दाखवतात ते बोलते झाले.

आरोपींकडून एक पल्सर मोटरसायकल, एक काळे रंगाची बॅटरी, एक लोखंडी फायटर, मोबाईल, एक लाल रंगाची बॅग त्यामध्ये तीन लोखंडी पट्ट्या व त्यावर दोन बाजूस खिळ्यासारखे अणुकुचीदार लोखंडी सुळे, बॅटरी, टेस्टर मिरचीपूड, हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल, लोखंडी साखळी, चाकू अशा प्रकारचे साहित्य जप्त केले.

आरोपींमध्ये गणेश बाळासाहेब शेंडगे (वय 20, रा. चिंचोली फाटा ता. राहुरी जि. अहमदनगर) अनिल काशिनाथ माळी (वय 18 वर्षे, रा. महालखेडा ता. येवला जि. नाशिक), आकाश रावसाहेब दुनबळे (वय 18 रा. महालखेडा ता. येवला जि. नाशीक ) सोमनाथ रामदास खलाटे ( रा. खलाटेवाडी ता. आष्टी जि. बीड), बाळासाहेब शिवाजी पगारे (वय 23 रा. शिंगवे ता. राहाता) विश्वास बाळू साळवे ( वय 20 रा. शिंगवे नाईक ता. जि. अहमदनगर) या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तर बाबासाहेब उर्फ बल्लू भाऊसाहेब साळवे (रा. शिंगवे नाईक) हा पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलीस नाईक बाचकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राहाता पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)