राष्ट्रीय कराटे स्पर्धेत भोसले, वर्पे यांस पदके

कोपरगाव – सुरत (गुजरात) येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत लहान मुलांच्या गटात येथील अद्वैता गोविंद भोसले हिने काता व कुमिती या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदकांची कमाई केली. ईशान समीर वर्पे याने 1 सुवर्ण, एक कांस्यपदक पटकाविले. या राष्ट्रीय स्पर्धेत 22 राज्यांतील तब्बल आठशे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.

महाराष्ट्र राज्याच्या 52 मुला-मुलींच्या संघाने 90 पदकांची कमाई करीत द्वितीय क्रमांक पटकावला. जपान येथील ग्रॉंडमास्टर ताकियो नानाहोशी यांच्या हस्ते विजेत्या संघाला चषक प्रदान करण्यात आला. यावेळी अध्यक्ष कल्पेश मकवाना, महाराष्ट्र कराटे असोसिएशनचे अध्यक्ष सुदर्शन पांढरे यांच्या हस्ते सुवर्णपदक व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले.

-Ads-

हे दोघे जपान येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी देशाचे प्रतिनिधत्व करणार असल्याची माहिती सुदर्शन पांढरे यांनी दिली. येथील डॉ. गोविंद भोसले यांची अद्वैता ही मुलगी, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांचा ईशान पुतण्या आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)