गारपिटीचे महसूल विभागाकडून पंचनामे

File photo

संगमनेर – संगमनेर तालुक्‍यातील जवळे कडलग परिसरात सोमवारी (दि.19) वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीत परिसरातील द्राक्ष व डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले. काल सकाळी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी केली.

जवळे कडलक, राजापूर, निमगाव भोजापूर, चिखली या गावांमध्ये सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. सुमारे एक तास चाललेल्या पावसाने या भागातील द्राक्ष, डाळिंब या फळबागांना गारांनी झोडपले. गारांच्या तडाख्याने सुमारे 600 ते 1000 एकर डाळिंबाचे क्षेत्र, तर 250 एकर द्राक्षांच्या बागांचे पूर्णपणे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तवला आहे.

“जवळे कडलक परिसरात सोमवारी झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपिटीत शेतकऱ्याच्या द्राक्ष व डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिसरात पाहणी केली असून, अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवला आहे.                  -सुभाष कदम, निवासी नायब तहसीलदार संगमनेर

-Ads-

मंगळवारी सकाळीच निवासी नायब तहसीलदार सुभाष कदम, मंडल अधिकारी दीपक पोटे, तलाठी प्रीती वर्पे, ग्रामसेवक आर. एम. राठोड, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांनी जवळे कडलक परिसरात द्राक्ष व डाळिंब बागांची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत राहतळ यांनी नुकसानीची पाहणी केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)