सैतवाल समाजाच्या कार्यकर्त्यांचे चार दिवसांनी मागे

खासदार गांधी यांची शिष्टाई ठरली फलदायी

नगर  – महाजन गल्लीमधील दिगंबर सैतवाल जैन समाजाचे महावीर स्वामी जैन मंदिरावर काही वर्षापासून बेकायदेशीरपणे काहींनी कब्जा केला आहे. याच्या निषेधार्थ नगरमधील सैतवाल जैन समाजाचे स्वप्नील साखरे व नीलेश गोपालकर यांनी महाजन गल्लीमधील महावीर स्वामी मंदिरातच चार दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. महाजनगल्ली येथील महावीर स्वामी जैन मंदिरात सुरू असलेले उपोषण खासदार दिलीप गांधी यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलनकर्त्यांनी सोडले.

-Ads-

या आंदोलनात उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली आहे. समाजाचा हा प्रश्‍न असून, तो सोडवू, असे आश्‍वासन खासदार गांधी यांनी दिले. गांधी यांसाठी खंडेलवाल व जैन सैतवाल समाजाच्या वैयक्तिक बैठका घेऊन मार्ग काढला. उपोषणस्थळी खासदार दिलीप गांधी यांनी उपोषणकर्ते स्वप्नील साखरे व नीलेश गोपालकर यांची भेट घेतली.

गांधी म्हणाले, “जैन समाज मुळात अल्पसंख्यांक आहे. अनेक प्रश्‍न समाजाचे प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत समाजातील घटक असलेले जैन सैतवाल समाज व खंडेलवाल समाज आपआपसात वाद घालत बसले तर प्रश्‍न सुटण्यापेक्षा अधिक वाढतील.’ म्हणून दोन्ही समाजाने सामुपचाराने विचार करुन आपआसातील वाद मिटवावा. यासाठी मी स्वत: पुढाकार घेईल, असे आश्‍वासन खा.दिलीप गांधी यांनी दिल्यावर गेल्या चार दिवसांपासून महाजन गल्ली येथील जैन महावीर मंदिरात जैन सैतवाल समाजाचे स्वप्नील साखरे व नीलेश गोपालकर सुरु असलेले उपोषण मागे घेतले.

भाजपचे नरेंद्र कुलकर्णी, जैन सैतवाल समाजाचे भारतभुषण भागवत, संजय महाजन, दिलीप पानगांवकर, संतोष भोसे, अनिलकुमार साखरे, आदिनाथ देशमाने, वर्धमान घोंगडे, योगेश चौधरी, रमेश डेरे, प्रकाश भाळवणकर, विजय औटी, भरत औटी, लक्ष्मी गोपालकर, निता भागवत, अपूर्वा भोसे, छाया धोंगडे, जयमाला महाजन, अंकिता साखरे आदी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)