विजेच्या धक्क्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

शिर्डी – विजेच्या खाबांवर अडकलेला पतंग काढण्याकरीता खांबावर चढलेल्या विद्यार्थ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही आज (दि. 19) दुपारच्या सुमारास तालुक्‍यातील साकुरी शिवारात घडली. कैलास पांडुरंग गिरमे (वय 40, रा. गिरमेवस्ती, साकुरी) यांनी राहाता पोलिसात या घटनेबाबत खबर दिली आहे.

आज दुपारी साकुरी शिवारातील गमे हॉस्पिटल शेजारील सुरेंद्र सांड याच्या मोकळ्या जागेत कुष्णा वाल्मीक जगताप (वय 11, रा. गिरमेवस्ती, साकुरी) हा खेळ होता. त्याला या परिसरातील विजेच्या खाबांवर पंतग अडकलेला दिसला. त्यामुळे तो पंतग काढण्याकरिता खाबांवर चढला असता, त्याला विजेचा शॉक लागून तो जमिनीवर कोसळला.

त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्‍टरांनी त्यास मृत घोषित केले. राहाता पोलिसांनी अकस्मात मुत्यूची नोंद केली आहे. कुष्णा हा संत गाडगे बाबा आश्रम (लोहारा कसारा) या ठिकाणी इयत्ता सहावीमध्ये शिकत होता. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)