अळसुंदे शाळेतील डेडस्टॉक रूमला आग 

कर्जत – तालुक्‍यातील अळसुंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील डेडस्टॉक रूमला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे रविवारी आग लागली. या आगीत जुने बेंच, मोडक्‍या खुर्च्या, पेपरची रद्दी आदी साहित्य जळून खाक झाले. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आग तात्काळ आटोक्‍यात आल्याने पुढील अनर्थ टळला.

डेडस्टॉक रूममध्ये असलेल्या वीज मीटर युनिटमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली. डेड स्टॉकमध्ये असलेल्या पेपरच्या रद्दीने पेट घेतला. शाळेत आग लागल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी एकत्र येऊन तात्काळ आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. पाइपलाइनद्वारे पाणी आणून त्यांनी आग आटोक्‍यात आणली. त्यामुळे जवळच्या खोल्यांमध्ये आग पसरली नाही. घटनेची माहिती समजताच शाळेतील शिक्षकांनी तात्काळ शाळेकडे धाव घेतली व घटनास्थळाची पाहणी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)