राळेगणसिद्धी येथे काव्यमैफलींचे आयोजन

राळेगणसिद्धी – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मातोश्री कै. लक्ष्मीबाई बाबुराव हजारे यांच्या 16 व्या स्मृतिदिनानिमित्त आज (दि. 19) राळेगणसिद्धी परिवाराने आई या विषयावर काव्यांजली या काव्यमैफलींच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवलभाऊ फिरोदिया सभागृह, हिंद स्वराज ट्रस्ट येथे सायंकाळी 7 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने राज्यातील नामवंत कवींची काव्यमैफल रंगणार आहे.

या काव्यांजली कार्यक्रमासाठी कवी गणेश मरकड (तहसीलदार, पारनेर), नारायण पुरी (नांदेड) , अरुण पवार (बीड), अनंत राऊत (अकोला), अंकुश आरेकर (सोलापूर), भरत दौंडकर (राळेगणसिद्धी) हे नामवंत कवी सहभागी होणार आहेत. त्यामुळे काव्यप्रेमींसाठी ही काव्यपर्वणी ठरणार आहे.

काव्यप्रेमींसाठी कै. मातोश्री लक्ष्मीबाई बाबुराव हजारे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामांकित कवींना एका व्यासपीठावर आणण्याचे काम उद्योजक सुरेश पठारे, दादा पठारे, डॉ. गणेश पोटे, उपसरपंच लाभेष औटी, सुनील हजारे, डॉ. धनंजय पोटे, शरद मापारी, सुनील मापारी यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)