कोपरगावात स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

कोपरगाव – शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने रिक्षा स्टॅंड चौकात तैलचित्र उभारून शिवसेना पदाधिकारी शिवसैनिकांनी अभिवादन केले. यावेळी नगर उत्तर उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे म्हणाले, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या मनात अस्मितेची मशाल सदैव तेवत ठेवली.

राजकारणात मानाचे पान दिले. माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे म्हणाले, स्व. ठाकरे यांनी अखंड हिंदुस्थानातील जनतेमध्ये देव, देश आणि धर्माबद्दलचा स्वाभिमान जागृत केला. सामान्य माणसाला सामाजिक प्रतिष्ठा व स्वाभिमान मिळवून दिला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चलो अयोध्या, असा नारा दिला आहे. त्यांच्या हाकेला साथ देत कोपरगावातून मोठ्या संख्येने शिवसैनिक जाणार असल्याचे झावरे यांनी सांगीतले.

-Ads-

यावेळी शहरप्रमुख अस्लम शेख, नगर उत्तर महिला उपजिल्हाप्रमुख नगरसेविका सपना मोरे, युवासेनेचे विक्रांत झावरे, उपशहरप्रमुख प्रफुल्ल शिंगाडे, कलविंदर दडीयाल, लक्ष्मण मंजूळ, उपतालुकाप्रमुख सलीम पठाण, संघटक बाळासाहेब साळुंके, विभाग प्रमुख विकास शर्मा, रफिक शेख, गोपाळ वैरागळ, सागर चव्हाण, वसीम शेख, अक्षय वाकचौरे, अक्षय नन्नावरे, बिलाल पठाण, टॅक्‍सी सेना प्रमुख श्रीप्रसाद भसाळे, संजय वाणी, भरत मोरे, दिलीप आरगडे, दत्ता पुंडे, बाळासाहेब साळुंके, गगन हाडा, किरण खर्डे यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)