अनंत फंदी व्याख्यानमालेस संगमनेर येथे आज प्रारंभ

संगमनेर, दि. 17 (प्रतिनिधी) – संगमनेर येथील कवी अनंत फंदी प्रतिष्ठान आयोजित व्याख्यानमालेस रविवार दि.18 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. व्याख्यानमालेचे यंदाचे 41 वे वर्ष आहे. यावेळी कवी अनंत फंदी यांचे द्विशताब्दी स्मृती वर्ष असल्याची माहिती कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचे प्रकल्प प्रा. ओंकार बिहाणी व प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ.ज्योती मालपाणी यांनी दिली.

रविवार दि.18 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ चित्रपट अभिनेते सुनिल बर्वे यांच्या प्रकट मुलाखतीने होत आहे. सोमवार दि. 19 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथील उत्तम वक्ते महेश अचिंतलवार यांचे “सुख ऑनलाईन आहे’ या विषयावर, मंगळवार दि.20 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. उल्हास जाजू यांचे “मला भावलेले गांधी-विनोबा’ या विषयावर, बुधवार दि.21 नोव्हेंबर रोजी साहित्यिक निरजा यांचे “स्त्री-साहित्यातील आणि वास्तवातील’ या विषयावर, गुरुवार दि.22 नोव्हेंबर रोजी निर्माते व दिग्दर्शक योगेश सोमण यांचा “आनंदडोह’ हा संत तुकारामांच्या जीवनावरील एकपात्री प्रयोग होणार आहे.

-Ads-

शुक्रवार दि.23 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांचे “आर्थिक महासत्ता-एक स्वप्नं?’ या विषयावर, शनिवार दि.24 नोव्हेंबर रोजी नाबार्डचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत डॉ.यशवंत थोरात यांचे “छत्रपती शिवाजी महाराजांना विसरण्याची वेळ आली आहे का?’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

या व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प समिती सदस्य डॉ.अनिल राठी, जसपाल डंग, सीए नारायण कलंत्री, कवी अनंत फंदी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.प्रदीप मालपाणी, सचिव अरुण ताजणे, खजिनदार ओमप्रकाश आसावा, सहसचिव पापय्या सिरसुल्ला, कार्यकारिणी सदस्य प्रदीप मालाणी, सुनिल चांडक व प्रतिष्ठानचे सर्व सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत. या वर्षीची व्याख्यानमाला स्व.प्रकाश बर्डे यांना समर्पित करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)