शिवसैनिकांकडून सहा गायींची सुटका

संगमनेर – संगमनेर तालुक्‍यातील साकूर येथील वाघवाले वस्तीवरून शिवसैनिकांनी सहा गायींची सुटका केली. तसेच असा प्रकार पुढे घडल्यास आंदोलन करण्याचा इशारा घारगाव पोलीस ठाण्यास दिलेल्या निवेदनात दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, साकूर भागातील वाघवालेवस्ती येथे दिवसाढवळ्या गावरान गायींचा व्यापार चालत आहे. याची माहिती मिळाल्यावर शिवसैनिक केथे गेले असता, तेथे सहा गायी आढळून आल्या. सदर गायी कत्तलखान्यात जाऊ नये, म्हणून शिवसैनिकांनी ताब्यात घेतले. सदर सुटका केलेल्या सहा गायींची गुलाब भोसले, आदिक शेंडगे, शिवाजी खेमनर, बाळासाहेब झिटे, एकनाथ खेमनर हे सांभाळ करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

-Ads-

सकाळी दहा वाजता साकूर चौफुलीवर सुटका केलेल्या गायींना आणण्यात आले. तसेच गायींना चारा देण्यात आला. यावेळी घारगाव पोलीस ठाण्याचे पो. कॉ. किशोर लाड उपस्थित होते. यावेळी शिवसेना उत्तर नगर सहसंघटक एकनाथ खेमनर, युवा सेना उपतालुकाप्रमुख गुलाब भोसले, योगेश खेमनर, सुभाष डोंगरे, विवेक सागर, पंढरीनाथ ढेंबरे, सावळेराम खेमनर, सचिन ढेंबरे, संदीप खिलारी, मंत्री खेमनर, संदीप डोंगरे, दीपक पारधी, सुरेश पारधी, गणेश डोंगरे, बाळासाहेब झिटे, राहुल सागर, बबलू शेंडगे, अमोल झिटे, चेतन फासाटे आदी शिवसैनिकांनी या गायींची सुटका केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)