आज पालकमंत्री पाथर्डी तालुका दौऱ्यावर

संग्रहित छायाचित्र...

पाथर्डी – तालुक्‍यातील टंचाईसदृश्‍य भागाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री राम शिंदे आज पाथर्डी तालुक्‍याच्या दौऱ्यावर आहेत. तालुक्‍यातील टंचाईग्रस्त गावांची पाहणी झाल्यानंतर पालकमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत दुपारी अडीच वाजता तहसील कार्यालयात टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी अकरा वाजता औरंगाबाद येथील कार्यक्रम उरकून पालकमंत्री शिंदे दुपारी एक वाजता तालुक्‍यातील तिसगाव येथे ये टंचाई सदृश्‍य भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर मढी परिसरात पाहणी करुन, दुपारी अडीच वाजता तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांबरोबर टंचाई आढावा बैठक होणार आहे. बैठकीनंतर कोरडगाव मार्ग शेवगाव तालुक्‍यातील बोधेगाव परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)