राहुरी-औरंगाबाद बसचे भातकुडगाव फाटा येथे स्वागत 

File photo

भावीनिमगाव – महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ शेवगाव व तालुक्‍यातील भातकुडगाव परिसरातील नागरिकांच्या वतीने शेवगाव नेवासा राज्यमार्गावरील भातकुडगाव फाटा येथे बसला पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. बसचे चालक वाहकांना शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

शेवगाव तालुका हा मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. एक वर्षापासून या मार्गावरून औरंगाबाद बस सुरू करावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत होती. या मागणीची दखल घेऊन राहुरी – औरंगाबाद बस सुरु केली आहे. त्यामुळे प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

ही बस राहुरी आगारातून सकाळी 7 वाजता निघून सोनई , शिंगणापूर, घोडेगाव, कुकाणा, भातकुडगाव फाटा, शेवगाव, पैठण मार्गे औरंगाबादला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव उपाध्यक्ष शंकर मरकड, भातकुडगाव बाळासाहेब वडणे, उद्धव पवार, बजरंग हॉटेलचे विठ्ठल फटांगरे यांनी बसला पुष्पहार घालून स्वागत केले. बसचालक बशीर सय्यद व वाहक सोमेश्वर खराडे व आगार प्रमुख सुहास तरवडे यांना शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)