श्रीगोंद्यातील अपघातात दोन ठार

श्रीगोंदे – तालुक्‍यातील नगर-दौंड महामार्गावरील कोळगाव फाट्याजवळ गुरुवारी (दि.8) दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दोघा दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सखाहरी गोविंद नानकर (वय 50, रा. कडीतकुळ खुर्द, ता. श्रीरामपूर) व रामेश्वर गबाजी मेनगर (वय-40, रा. कडीतकुळ बुद्रुक, ता. श्रीरामपूर) या दोघा दुचाकीस्वारांचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला.

याबाबत समजलेली माहिती अशी, गुरुवारी (दि.8) श्रीरामपूर तालुक्‍यातील सखाहरी नानकर व रामेश्वर मेनगर हे दोन जण दुचाकीवर बारामती येथील बागिरदर्गा येथे देवदर्शनाला जात होते. गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास हे दोघे दुचाकीस्वार तालुक्‍यातील कोळगाव फाट्याजवळून जात असताना, नगर-दौंड महामार्गावर दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की, यामध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)