मुलभूत प्रश्न सोडविण्याबरोबरच बेरोजगारांना देणार काम : खा.गांधी

कुस्तीपटू अंजली देवकर यांचा भाजपात प्रवेश

नगर – भाजपाने जातीपातीच्या पलीकडे जाऊन देशाला व राज्याला एक विकासाचा अजेंडा जनतेसमोर ठेवला. जनतेच्या विकासाच्या दृष्टीने विविध योजना सक्षमपणे राबविल्या. नगर शहराच्या विकासासाठी केंद्राकडून व राज्याकडून वेळोवेळी मोठा निधी उपलब्ध करून दिला. परंतु स्थानिक सत्ताधार्यांमुळे या निधीचा योग्य उपयोग झाला नाही. गटारीमध्येच पैसे घातले. यासाठी नगरकरांनी भाजपाला एकहाती सत्ता मिळवून द्यावी. नगर जिल्हयात पहिल्यांदाच परदेशी गुंतवणूक औद्योगिक वसाहतीसाठी झाली आहे. आता नगर शहर व जिल्ह्यात मोठमोठे कंपन्या येऊन स्थानिक युवकांच्या हाताला काम मिळणार आहे. नागरिकांचे मुलभूत प्रश्‍नाबरोबर हाताला काम देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन खा. दिलीप गांधी यांनी केले.

छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या कुस्तीपटू अंजली देवकर-वल्लाकट्टी, जितेंद्र वल्लाकट्टी व डॉ. आरती बुगे यांनी खा. दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी नगरसेवक किशोर डागवाले, नगरसेविका मालन ढोणे, गटनेते सुवेंद्र गांधी, सरचिटणीस किशोर बोरा, अजय ढोणे, गीतांजली काळे, सागर गोरे, विश्‍वनाथ पोंदे, चेतन जग्गी उपस्थित होते.

नगरसेवक किशोर डागवाले म्हणाले की, सर्वसामान्य माणसाला भाजप हाच पक्ष न्याय मिळवून देऊ शकतो. नगर शहरामध्ये शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाने महापालिकेमध्ये सत्ता भोगली आहे. आता एकदा भाजपाला संधी द्यावी. भाजपा हाच नगर शहराच्या विकासाला चालना देणारा पक्ष असेल. सर्वांना विचारात घेऊन नगर शहराच्या विकासाची घोडदौड आम्ही सुरू करू, असे सांगितले.

अंजली देवकर-वल्लाकट्टी म्हणाल्या की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेवून विविध योजना समाजापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. माझ्यासारख्या महिलेला स्वच्छता दूत म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. यापुढील काळात महिलांना बरोबर घेऊन शहरामध्ये स्वच्छतेचा संदेश देऊन महिलांच्या माध्यमातून जनजागृती केली जाईल. त्यामुळे शहर स्वच्छता व्हायला मदत होईल. महिलांचे सबलीकरणासाठी शासनाच्या विविध योजना महिलांपर्यंत घेऊन जाऊ. खा. गांधी यांच्या नेतृत्वाखाली शहरात चांगले काम आम्ही करू, असे सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)