माळीवाड्यात विना परवाना फटाक्‍यांची विक्री

file photo

नगर  – माळीवाड्यात विनापरवाना फटाक्‍यांची सार्वजनिक ठिकाणी कोणतेही उपाययोजनांचे खबरदारी न घेता विक्री होत आहे. कोतवाली पोलिसांनी यासंदर्भात कारवाई करत स्वप्नील पोपट ओव्हळ (वय 27, रा. गणपती तालीमजवळ) या युवकाविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.

कोतवाली पोलिसांनी आतापर्यंत हद्दीत तीन जणांवर अशी कारवाई केली आहे. शहरासह उपनगरातील अनेक भागात विनापरवाना फटाक्‍यांची विक्री होत असून, जिल्हा, मनपा आणि पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)