कर्जत-जामखेडवर बारामतीचे ‘लक्ष’

मतदार संघाच्या निरिक्षकपदी किशोर मासाळ

जामखेड – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथील अत्यंत विश्वासू सहकारी युवक नेते किशोर मासाळ यांची कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी हाती घेत आहे. लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. लोकसभेत जास्तीत जास्त जागा जिंकायच्या या दृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेसने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार राष्ट्रवादीने विधानसभा मतदारसंघनिहाय निरीक्षकांच्या नियुक्‍त्या करण्याचा निर्णय घेतला आहे.

पक्षाला दगाबाजी होऊ नये. स्थानिक गटबाजी उफाळू नये. स्थानिक नेते व कार्यकर्ते यांच्यात योग्य समन्वय रहावा, यासह अन्य बाबींवर लक्ष ठेवण्यासह पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीने कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित करत, या मतदारसंघावर थेट बारामतीचा वॉच रहावा याकरिता राष्ट्रवादी युवकचे नेते किशोर मासाळ यांच्याकडे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे.

पक्षात ऐनवेळी होणारी दगाबाजी व गटबाजी लक्षात घेता कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघावर किशोर मासाळ यांच्या रूपाने आता बारामतीचे लक्ष राहणार आहे. बारामतीने अर्थात राष्ट्रवादीने मासाळ यांची नियुक्ती करून मतदारसंघावर पुर्ण ताकदीने लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

किशोर मासाळ यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य शाहाजी राळेभात, माजी प्रदेश सरचिटणीस सुरेश भोसले, राष्ट्रवादीचे ओबीसीचे प्रदेश प्रवक्ते डॉ. कैलास हजारे, भगवान गिते, माजी पंचयात समिती सदस्य विजयसिंह गोलेकर, संभाजी राळेभात, प्रा. नितीन हुलगुंडे, यांच्यासह कर्जत तालुक्‍यातील व जामखेड तालुक्‍यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी निवडीचे स्वागत केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
8 :thumbsup: Thumbs up
3 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
2 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)