शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे दूध धंदा मोडकळीस : आ. थोरात

File Photo

संगमनेर – सध्या दूध व ऊस हे शेतकऱ्यांसाठी शाश्‍वत उत्पादनाची साधने आहे. मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे दूध संघ अडचणीत येत आहेत. त्यामुळे सरकारने दूध व्यवसायाला मदत करणे गरजेचे आहे. सरकार निवडणुका जवळ आल्याने घोषणा सुरू केल्या आहेत, अशी टीकाही माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

शिरापूर येथे संगमनेर तालुका सहकारी दूध संघ व दूध सागर सहकारी दूध संस्थेच्यावतीने वसुबारसेनिमित्त गायपोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आ. थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजीराव पा. खेमनर होते. व्यासपीठावर दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, लक्ष्मणराव कुटे, शिवाजीराव थोरात, आर. बी. राहाणे, रामहरी कातोरे, नानासाहेब गुंजाळ, सुरेशराव थोरात, ऍड. नानासाहेब शिंदे, बाळासाहेब शिंदे, कैलासराव पानसरे, मोहनराव करंजकर, डॉ. प्रतापराव उबाळे आदींसह मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी खांडगेदरा परिसरातील गायीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून राजहंस गोसिद्धी योजनेचा प्रारंभ करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देशमुख म्हणाले, यावर्षी अत्यंत अडचणीची परिस्थिती असतानाही दूध संघाने 25 कोटी रुपयांची अनामत, रिबेट शेतकऱ्यांना अदा केले आहे. दूध संघाच्या वतीने गायींच्या आरोग्यासाठी जंत निर्मूलन, विविध लसीकरण सातत्याने केले जात असून, या लसीकरणासाठी 50 टक्के अनुदान दिले जात आहे.

यावेळी विलास कवडे, विलास वर्पे, भास्कर सिनारे, बाबासाहेब गायकर, डॉ. गंगाधर चव्हाण, प्रतिभा जोंधळे, राजेंद्र चकोर, संतोष मांडेकर, अण्णा राहिंज, सुभाष पा.गुंजाळ, राजेंद्र देशमुख, धनराज पारासूर, योगेश पवार, छगनराव पांडे, भाऊसाहेब पांडे, कचरू पवार, भाऊ पारासूर, बाबासाहेब पवार, सुशील पवार, डॉ. पोखरकर, डॉ. क्षीरसागर, डॉ. एकसिंगे आदींसह कार्यकर्ते व परिसरातील दूध उत्पादक, शेतकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन वसंत बंदावणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)