ना. विखेंच्या वाहनांचा ताफा अडवण्याच्या घटनेचा निषेध

राहुरी फॅक्‍टरी – जायकवाडीला पाणी सोडू नये, म्हणून उच्च न्यायालयात पद्मश्री विखे कारखान्याने याचिका दाखल करून पाणी सोडण्यास स्थगिती मिळवली होती. त्यामुळे मराठवाड्यातील काही लोकांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गाड्यांचा ताफा अडविला होता. या प्रकाराचा देवळाली प्रवरा शहर कॉंग्रेस कमिटीच्यावतीने निषेध करण्यात आला.

नगर जिल्ह्यातील हक्काचे पाणी जायकवाडीला सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला असता, लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कारखान्याने पाणी सोडू नये, म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पाणी सोडण्यास स्थागिती मिळवली. दरम्यान कॉंग्रेसतर्फे राज्यभरात जनसंघर्ष यात्रा काढण्यात येत आहे. फुलंब्री, सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथे ही यात्रा जाणार होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यात्रेसाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार अब्दुल सत्तार आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे आले होते. तत्पूर्वी माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या निवासस्थानी भोजनासाठी ते थांबले होते. भोजन झाल्यानंतर फुलंब्रीला जाण्यासाठी जात असताना राधाकृष्ण विखे पाटील यांचा ताफा मराठवाड्यातील काही लोकांनी अडविण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व प्रवृत्तीचा देवळाली प्रवरा बाजारतळ येथे जोरदार घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला.

यावेळी जिल्हा कॉंग्रेस कमिटी सदस्य गणेश भांड, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र लोंढे, देवळाली प्रवरा शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे, उत्तम कडू, माजी नगरसेवक वैभव गिरमे, बाबा भिंगारे, भाऊसाहेब होले, दत्तात्रय दळवी, पिनू लोंढे, बाळासाहेब पठारे, अलम शेख, नितीन आढाव, पाराजी चव्हाण, कुणाल पाटील, शुभम पाटील, ऋषी राऊत, कैलास सांगळे, गणेश देशमुख, किशोर साळुंके, सौरभ घोलप, नीलेश कराळे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)