तेली समाजातर्फे वधू-वर मेळावा

सोनई – अहमदनगर तेली समाजातर्फे 2 डिसेंबर रोजी वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा नगर-मनमाड रस्त्यावरील झोपडी कॅंटीन येथील माऊली सभागृहात होणार आहे, अशी माहिती संयोजक विजय काळे, प्रा. सोमनाथ बनसोडे यांनी दिली.

तसेच जिल्हा तिळवण तेली समाजातर्फे अहमदनगर तेली वधू-वर डॉट कॉम ही वेबसाइट सुरू करण्यात आलेली आहे. संबंधितांनी या वेबसाईटवर नोंदणी करावी. नोंदणी करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर आहे. तरी जास्तीत जास्त विवाहेच्छूंनी मेळाव्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन विजय खंडागळे, विशाल पवार, भगवत लुटे, श्‍याम करपे, शांताराम काळे, ज्ञानेश्‍वर राऊत आदींनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)