बोंडअळीचे अनुदान खात्यावर- आ. कोल्हे

File photo

कोपरगाव -कोपरगाव तालुक्‍यात 2017-18 या हंगामात 4 हजार 649 हेक्‍टर क्षेत्रावरील कापसावर बोंडअळीचा माठा फटका बसला. या बाधित पिकांचे पंचनामे करून 7 हजार 22 बाधित शेतकऱ्यांसाठी 5 कोटी 88 लाख 92 हजार रुपयांच्या भरपाईची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यातील पहिल्या टप्प्यात 3 कोटी 31 लाख रक्कम प्राप्त झाली. उर्वरित 2 कोटी 75 लाख 92 हजार रुपयास मंजुरी मिळाली असून, ती लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.

आ. कोल्हे म्हणाल्या, शेतकऱ्यांना कुठलाही पक्ष नसतो. भरपाई मिळावी, म्हणून त्याचे प्रयत्न सुरू असतात. पण बोंडअळीच्या उर्वरित रकमेसाठी काही जणांकडून राजकारण केले गेले. ही रक्कम मिळावी, यासाठी शासनस्तरावर आपण पाठपुरावा केला. त्याप्रमाणे ही रक्कम मिळाली देखील. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत ही रक्कम शेतकऱ्यांना आधार ठरणार आहे. तालुका दुष्काळी जाहीर व्हावा, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)