जामखेडमध्ये एकता दौडला उत्स्फुर्त प्रतिसाद

जामखेड – सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जामखेड पोलीस ठाण्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एकता दौडला (रन फॉर युनिटी) शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक आणि स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधीचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मार्केट यार्ड येथून तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या हस्ते एकता दौडला प्रारंभ झाला. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार, शिवनेरी अकॅडमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे, वकील संघाचे माजी अध्यक्ष हर्षल डोके यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे म्हणाले, सरदार वल्लभभाई पटेल यांनी बालपणापासूनच राष्ट्रभक्ती जोपासली. भारताच्या अखंडतेसाठी कायम आग्रही भूमिका घेतली. त्यामुळेच त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या कार्यकर्तृत्वापासून आपण सर्वांनी प्रेरणा घेऊन राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रयत्न करु.

यावेळी पोलीस ठाण्याचे कर्मचारी, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक आणि स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधीचा आदी प्रमुख उपस्थित होते. बीड रोड, जयहिंद चौकातून खर्डा चौकात येथे विसर्जित झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)