दक्षता जनजागृती सप्ताहनिमित्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली भ्रष्टाचारविरोधी शपथ

नगर – सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 31 ऑक्‍टोबर या जन्मदिनापासून एक आठवडा दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यंदा 29 ऑक्‍टोबर ते 03 नोव्हेंबर 2018 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे भ्रष्टाचारविरोधी जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ सावेडी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना भ्रष्टाचारविरोधी शपथ देवून करण्यात आला.

लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक किशोर चौधरी यांनी या प्रतिज्ञेचे वाचन केले. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी महेश घोडके यांच्यासह मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
लाच देणे, लाच घेणे कायद्याने गुन्हा आहे. जर कोणी शासकीय अधिकारी व कर्मचारी शासकीय कामकाजासाठी लाच मागत असेल तर, तत्काळ पोलीस उपनिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाशी 0241-2423677 किंवा 1064 या निशुल्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आवाहन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम होणार असून, भ्रष्टाचारविरोधात जनजागृती व्हावी आणि नागरिकांना निर्भिडपणे तक्रार करता यावी यासाठी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन, शासकीय कार्यालयांच्या दर्शनी भागावर लाचलुचपत प्रतिबंधाबाबतची भित्तीपत्रके व माहितीफलक लावण्यात आली. याशिवाय, शहरातील विविध क्रीडा मैदाने, नागरिकांची गर्दीची ठिकाणे आदी ठिकाणी भ्रष्टाचारविरोधी जनजागृती पत्रकांचेही वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)