आरोग्य अधिकाऱ्यास साडी-चोळीचा आहेर

यशस्विनी महिला ब्रिगेड : आजारांनी नागरिकांचे दिवाळे

नगर – ऐन दिवाळीत साथीच्या आजारांनी सर्वसामान्य नागरिकांचा दिवाळा काढला आहे. साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी पाठपुरावा करुनदेखील त्याची दखल घेतली न गेल्याने असक्षम ठरलेल्या मनपा आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना यशस्विनी महिला ब्रिगेडतर्फे येत्या दोन दिवसात साडी-चोळीसह बागड्यांचा आहेर देण्याचा इशारा दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्यासह साधना बोरुडे, रंजना उकिर्डे, श्रीलता आडेप, अनिकेत कोळपकर, आदित्य जगधने, ऋतिक साळुंके यांनी शहराच्या खासगी रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयात डेंगी, चिकनगुणिया आदी साथीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची भेट घेतली.

रुग्णांनीदेखील महापालिकेकडून, आपण राहत असलेल्या ठिकाणी वेळेवर फवारणी झाले नसल्याचे सांगितले. तसेच यासंबंधी त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी.एम. मुरंबीकर, आरएमओ एस. के. सोनवणे यांच्याशी चर्चा केली. मोठ्या प्रमाणात शहरातील साथीच्या आजारांनी पिडीत रुग्ण खाजगी व सरकारी दवाखान्यात उपचार घेत असून, मनपा आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे त्यांची दिवाळी रूग्णालयामध्येच साजरी होणार आहे. तर सामान्य कुटुंबातील रुग्णांना वैद्यकीय खर्चामुळे दिवाळी साजरी करता येऊ शकणार नाही.

साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी तातडीने उपाययोजना करुन, महापालिकेच्या मलेरिया विभागाची झालेली दुरावस्था दूर करावी व शहरात नियमीत फवारणी व फॉगिंग करण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर उपाय योजना न झाल्याने शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. एक प्रकारे मनपाचा आरोग्य विभागच आजारी पडल्याची स्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप रेखा जरे यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)