शैक्षणिक कर्जासाठी ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

शेवगाव – बोधेगाव येथील सेंट्रल बॅंकेच्या शाखेत कागदपत्रांची पूर्तता करूनही शैक्षणिक कर्जासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे हेलपाटेमारून थकलेल्या ग्रामस्थांनी अखेर 13 नोव्हेंबरपासून बॅंकेपुढे उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

तहसीलदार डॉ. विनोद भामरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या तीन-चार वर्षांपासून परिसरात तीव्र दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे आपल्या पाल्यांचे शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येऊ नये, म्हणून आम्ही बॅंकेकडे शैक्षणिक कर्जाची मागणी केली. बॅंकेतील अधिकाऱ्यांनी एकाच वेळी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची माहिती न देता प्रत्येक वेळी नवनवीन कागदपत्रे आणण्यास सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही कर्मचारी अपमानास्पद वागणूक देतात. मागील दोन महिन्यांपासून टोलवाटोलवी सुरू आहे. मानसिक त्रास व अडवणुकीला कंटाळून बॅंकेसमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनावर बाळासाहेब लवंगे, सुनील केसभट, जालिंदर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, अशोक सगळे, राम तोरकडे, बबन चोथे यांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती बॅंकेचे मुख्यालय, खासदार दिलीप गांधी, आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)