रिकाम्या डंपरवर कारवाई तलाठी आणि कोतवालाला भोवली

तक्रारदारकाडून 10 हजारांची लाच घेताना दोघांना अटक

नगर – वाळू वाहतुकीचा रिकाम डंपरवर कारवाईची धमकी तलाठी आणि कोतवाल यांना चांगलीच भोवली आहे. डंपरवर कारवाईची धमकी देत 10 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी तलाठी अशोक बबन गाडेकर (वय 40) व कोतवाल विकास मुक्ताजी गारगुंड (वय 33) या दोघांना लाचलुचपतच्या नगर पथकाने अटक केली आहे. नोबेल हॉस्पिटलच्या उपहार गृहात ही लाच घेताना कारवाई करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तक्रारदार याचा डंपर मोकळा असताना कोतवाल विकास गारगुंड याने 28 ऑक्‍टोबरला पकडला होता. तो कारवाईसाठी तहसील कार्यालयात घेऊन चालले होता. रिकाम्या डंपरवर कारवाई करू नका, अशी विनंती तक्रारदाराने त्याला केली होती. कोतवाल गारगुंड याने डंपर सोडण्यासाठी आणि तो चालविण्यासाठी तलाठी गाडेकर याला भेटून महिन्याचा हप्ता ठरवून घेण्याबाबत सांगितले. त्यानुसार गारगुंड याने तक्रारदार आणि तलाठी गाडेकरचा मोबाईलवरून संपर्क करून दिला. तलाठी गाडेकर याने यावेळी डंपरवर कारवाई न होण्यासाठी सुमारे 50 हजार रुपयांची मागणी केली. डंपरवर विनाकारण कारवाई होईल, या भीतीपोटी तक्रारदार यांनी कोतवाल गारगुंड याला त्यावेळी 10 हजार रुपये दिले. गारगुंड याने त्यावेळी डंपरवर कारवाई न करता तो सोडून दिला.

कोतवाल गारगुंड याने 30 ऑक्‍टोबरला तक्रारदार यांना मोबाईलवर पुन्हा संपर्क साधला. तलाठी गाडेकर याने 35 हजार रुपये मागितले आहे, असे सांगितले. तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत विभागाच्या नगर पथकाला संपर्क साधून तक्रार दाखल केली.

तक्रारदार, तलाठी गाडेकर व कोतवाल गारगुंडमध्ये तडजोड होऊन 15 हजार रुपये घेण्याचे ठरले. त्यानुसार लाचेची रक्कम घेण्यासाठी आज तलाठी गाडेकर व कोतवाल गारगुंड हे नोबल हॉस्पिटलच्या उपहार गृहात तक्रारदाराला बोलावून घेतले होते. तडजोडीच्या रकमेपैकी तक्रारदाराकडून 10 हजारांची लाच घेताना तलाठी गाडेकर व कोतवाल गारगुंड या दोघांना पथकाने अटक केली.

पोलीस उपअधीक्षक किशोर चौधरी, पोलीस निरीक्षक दिपक करांडे, श्‍याम पवरे, पोलीस कर्मचारी तनवीर शेख, सतीश जोशी, प्रशांत जाधव, रमेश चौधरी, विजय गुंगल, राधा खेमनर, अशोक रक्ताटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)